Posts

बहिरेश्वरचा शेषशायी विष्णू...

Image
 बहिरेश्वरचा शेषशायी विष्णू...  कोल्हापूर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर आणि "जिथे सोन्याचा पाऊस पडतो" अशी आख्यायिका आहे अशा ऐतिहासिक 'कसबा बीड' गावापासून अवघ्या ४ किलोमीटर वर असलेले "बहिरेश्वर" हे गाव. गावाचे मूळ नाव 'भैरवेश्वर' आहे. गावात एक मध्ययुगीन शिवमंदिर आहे जिथे भैरवाची सुद्धा पूजा केली जाते. यावरूनच गावाला भैरवेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे असे वाटते. काही काळ 'भैरेश्वर' असे नाव प्रचलित होते. त्याचाच अपभ्रंश होऊन सध्याचे बहिरेश्वर असे गावाचे नामकरण झालेले आहे. पश्चिमेकडे डोंगर, पूर्वेकडे भोगावती नदी आणि समृद्ध शेतीने नटलेल्या या गावातील मुख्य आकर्षण म्हणजे नयनरम्य अशा तलावाच्या मधोमध असणारे शेषनारायणाचे मंदिर. गावात याला कृष्णाचे मंदिर असे म्हणतात. पिरॅमिड प्रमाणे खाली विस्तारत जाणाऱ्या साधारणतः ६०० स्क्वेअर फुट चौरसाकृती पायावर उभे असलेले अत्यंत साध्या रचनेतील हे उत्तराभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी असलेल्या तलावातील जलवनस्पती आणि कमलपुष्पे मन मोहून टाकतात. मंदिरातील शेषनागावर पहुडलेल्या विष्णुची चतुर्भुज मूर्ती ही एकमेवाद्व

माहितीतून इतिहासाची ओळख

 इतिहासाची ओळख नव्याने करून देण्यासाठी, नवनवीन माहिती या ब्लॉग वर मांडण्यात येणार आहे.  त्यातून निखळ संवाद साधण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. 

भूमिका

इतिहासाचा शोध घेऊन पुनर्लेखन करणे, ही सध्याची गरज आहे. तर मग चला आपली इतिहासाविषयाची मते मांडू, समजावून घेऊ आणि आपल्या इतिहासाची नव्याने ओळख करून घेऊ. आपले सर्वांचे स्वागत !!!